मला माहित नाही नेमक नात काय असते. ते कस जपावे त्याला कस बांधाव. ज्याला कळत त्याच्याकडे माणसं रहात असावी. पण ज्याच्याकडे रहात नाही त्याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे नसतात ती, हा कदाचित ती शाररिक दृष्ट्या नसतील. पण हा ! मनाने नक्कीच जोडलेली असतात. ती व्यक्त होत नाही इतकंच. जी व्यक्त होतात ते त्यातला गोडवा साजरा करतात, जे करत नाही ते मनाच्या कोपऱ्यात साजरा करतात, परिस्थिती किंवा माणसानी तयार केलेल्या भिंतीमुळे ती मोकळे पणाने व्यक्त होऊ शकत नाही हेच काय ते कारण.
नात रक्ताचं नसले तरी ती ओढली जातात ते आत्म्यापासून. का ओढ वाटावी एका अनोळखी व्यक्ती विषयी. कधी पूर्वी भेटलेलो नसलो तरी कधी अचानक भेट होते नी ती व्यक्ती काही वेळेत आपलं कधी होऊन जाते कळतच नाही. कधी संवाद याची गरज नसते, ना कसल्या देण-घेणे याची. फक्त छान वाटत. त्या अस्तित्वाची, त्या आठवणीची, ती स्पंदन ओढली जातात.
कृष्ण जरी आई देवकीच्या पोटी जन्माला आला तरी आई यशोदेने त्याला सांभाळले. तिची माया, तीच प्रेम हीच तर नाळ होती त्या नात्याची.
हि नाळ अनेक नात्यात अनुभवतो, कधी रडू आल्यावर मैत्रिणीच्या दिलेल्या खांद्यावर ज्यात तक्रार नसते फक्त तीच सोबत असण्याचा विश्वास असतो, कधी बाबांच्या धाक युक्त ओरडण्यात, तर कधी आपण कुठे लांब जातोय तर 'काही होणार नाही ना? 'एका मित्राच्या काळजी युक्त रडण्यातुन. तर कधी छकुलीच्या येण्यामुळे टपोरी भाईचा झालेला जबाबदार बाबा, कधी लोकल ट्रेन मध्ये कोणतरी इतकं मनापासून गात की बिदागि निघतेच खिशातून, कोणी विश्वास नसला तरी आजीच्या आनंदासाठी नमस्कार करतो त्या नातवाच्या नमस्कारात असते, आजोबांच्या तुटलेल्या चष्मा ऑनलाईन ऑर्डर करण्याऱ्या आजच्या जमान्यातल्या शिऱ्या मध्ये असते.
इतकंच का रस्त्यावरून जाताना काही दक्षिणा न घेता फक्त आशीर्वाद देणाऱ्या तृतीय पंथात पण असते. असे किती आणि काय अनुभव सांगायचे?....
काही नाती आणि ते नात सोबत असतात, पण काही नाती देहरूपाने अथवा मानसिक रूपाने मरूण जातात, काही तर फक्त क्षणासाठी येतात, त्यांच्याशी कसलंच नसलेल्या नात्याची ती प्रेमाची नाळ मात्र तशीच आयुष्यभर सोबत राहते. नी आपण जगलेल्या नी नव्याने जगणाऱ्या त्या खास क्षणाशी जोडून ठेवते ती हि नाळ...
- छाया
तुमच्या आयुष्यात असेच काही क्षण असतील तर नक्की आम्हाला पण सांगा. ती सुंदर अनुभूती सर्वांनी अनुभवूया.
No comments:
Post a Comment