Sunday, December 29, 2019

अदृश्य नाळ

          मला माहित नाही नेमक नात काय असते. ते कस जपावे त्याला कस बांधाव. ज्याला कळत त्याच्याकडे माणसं रहात असावी. पण ज्याच्याकडे रहात नाही त्याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे नसतात ती, हा कदाचित  ती शाररिक दृष्ट्या नसतील. पण हा ! मनाने नक्कीच जोडलेली असतात. ती व्यक्त होत नाही इतकंच. जी व्यक्त होतात ते त्यातला गोडवा साजरा करतात, जे करत नाही ते मनाच्या कोपऱ्यात साजरा करतात, परिस्थिती किंवा माणसानी तयार केलेल्या भिंतीमुळे ती मोकळे पणाने व्यक्त होऊ शकत नाही हेच काय ते कारण. 
नात रक्ताचं नसले तरी ती ओढली जातात ते आत्म्यापासून. का ओढ वाटावी एका अनोळखी व्यक्ती विषयी. कधी पूर्वी भेटलेलो नसलो तरी कधी अचानक भेट होते नी ती व्यक्ती काही वेळेत आपलं कधी होऊन जाते कळतच नाही. कधी संवाद याची गरज नसते,  ना कसल्या देण-घेणे याची. फक्त छान वाटत. त्या अस्तित्वाची, त्या आठवणीची, ती स्पंदन ओढली जातात. 
कृष्ण जरी आई देवकीच्या पोटी जन्माला आला तरी आई यशोदेने त्याला सांभाळले. तिची माया, तीच प्रेम हीच तर नाळ होती त्या नात्याची. 
            हि नाळ अनेक नात्यात अनुभवतो, कधी रडू आल्यावर मैत्रिणीच्या दिलेल्या  खांद्यावर ज्यात तक्रार नसते फक्त तीच सोबत असण्याचा विश्वास असतो, कधी बाबांच्या धाक युक्त ओरडण्यात, तर कधी आपण कुठे लांब जातोय तर 'काही होणार नाही ना? 'एका मित्राच्या काळजी युक्त रडण्यातुन. तर कधी छकुलीच्या येण्यामुळे टपोरी भाईचा झालेला जबाबदार बाबा, कधी लोकल ट्रेन मध्ये कोणतरी इतकं मनापासून गात की बिदागि निघतेच खिशातून, कोणी विश्वास नसला तरी आजीच्या  आनंदासाठी नमस्कार करतो त्या नातवाच्या नमस्कारात असते, आजोबांच्या तुटलेल्या चष्मा ऑनलाईन ऑर्डर करण्याऱ्या आजच्या जमान्यातल्या शिऱ्या मध्ये असते. 
इतकंच का रस्त्यावरून जाताना काही दक्षिणा न घेता फक्त आशीर्वाद देणाऱ्या तृतीय पंथात पण असते. असे किती आणि काय अनुभव सांगायचे?.... 
काही नाती आणि ते नात सोबत असतात, पण काही नाती देहरूपाने अथवा मानसिक रूपाने  मरूण जातात, काही तर फक्त क्षणासाठी येतात, त्यांच्याशी कसलंच नसलेल्या नात्याची ती प्रेमाची नाळ मात्र तशीच आयुष्यभर सोबत राहते. नी आपण जगलेल्या नी नव्याने जगणाऱ्या त्या खास क्षणाशी जोडून ठेवते ती हि नाळ... 
- छाया 


  तुमच्या आयुष्यात असेच काही क्षण असतील तर नक्की आम्हाला पण सांगा. ती सुंदर अनुभूती सर्वांनी अनुभवूया. 

Thursday, September 19, 2019

मन की बात

नमस्कार
थोडी मन कि बात  माझी करावी वाटते. सर्वाना ते लागू होईल असे अजिबात नाही पण मला लागू आहे इतके नक्कीच.       

       आईसारखी मैत्रीण दिल्यामुळे मी आधीच बाप्पाला खूप थँक्स म्हणून झाले होतं. मध्यम वर्गीय कुटुंबात असतें तसेच माझ्या वडिलांसोबत नाते Tom अँड Jerry सारखे. My crime पार्टनर माझा लहान भाऊ आणि माझे काही ( नातेवाईक म्हणतात हे किती आहेत असे) मित्र मैत्रीण. माझी फॅमिली सुद्धा तितकीच प्रेमळ नी as usual थोडे काळजी घेणार सुद्धा फक्त प्रत्येकाची प्रेम करायची नी काळजी करायची पद्धत वेगळी इतकंच... कधीकधी judgmental होतातच पण त्यात त्यांचा पण दोष असा नाहीच त्यांच्यासाठी त्या नव्याने नी आकलनाच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी असतात.. नी नाते आले कि consider करणं आलेच म्हणा.
       मध्यम वर्गीय कुटुंबात एक सरळ साधी वाट असते. ती वाट सोडून आडवाटेने जाणारे एकतर ऍबनॉर्मल or mad  or बेजबाबदार ठरवले जातात. एकंदरीत यात त्या व्यक्ती सोबत राहणं त्याला पाठिंबा देण तेपण आताच्या स्पर्धेच्या युगात ज्यात तुमचे पाय खेचायला बरेच जण असतात अशा वेळी त्या सोबत राहण्याऱ्याची पण  कसरतच. त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुमची जी धडपड चालू असते त्याला जमेल त्या मार्गाने टेकू लावणारे हातही असतात ते आपली Family असतेच पण तिकडं again नाते आले कि  कुठेतरी अपेक्षा असते. छोटीशी का होईना. ती चुकीचं नक्कीच नाही.
           पण मैत्री हे असे रसायन आहे जिथे तेपण नसते. तिथं असते " तुला पडायचं ना !पड!! आहे त्या खड्यात, मीपण! सोबत, नी तिथून वर काढायला पण.तुझे किती गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यावरून तुम्हाला choose नाही केल जात, तर अस तुम्ही करत असताना तुम्हाला काही त्रास तर होणार नाही ना याची तुमच्या पण नकळत काळजी घेतली जाते. तुमच्या कडून कोणाला त्रास तर होत नाही ना हयाची खबरदारी घेतली जाते. तिथे Glass ला Glass लावले जातात नी उलटी झाली कि ते cleanpn करतात,  त्यावरून कसला घाणेरडा, वाया गेलाय असा तर नक्कीच बोललं नाही जात एकवेळ नातेवाईक बोलतील, त्या ठिकाणी,  तुमचं character judge केल जाते,  ह्या अश्या अनेक छोटया गोष्टीवरून बोलणं सोडलं जातं नाकारलं जाते, असा नाही कि ते नातेवाईक वाईट पण जितके एखादा मित्र हे प्रांजळपणे, निःस्वार्थ वृत्तीने कसल्याच चारित्र्याचं सर्टिफिकेट न देता करतो,  तितक्याच प्रमाणात नातेवाईक करतात हे फार कमी पाहायला मिळेल.
       इथे मला काळजी वाटते हे दाखवलं नाही जात तर घेतली जाते. Offcource इकडे  given take असावं लागत पण नाही जमत प्रत्येक वेळी, तरी "हा असतो का माझ्या ह्या गोष्टीत, त्यानं आला का ते करायला" हे हिशोब नाही लावले जात,  तिथे फक्त प्रेमाची चाळणी असते,  कधीकधी तेपण कमीअधिक दिसत, तरीपण,  हे मित्र! येडे जीव लावायच काही सोडत नाही.
       दरवर्षी प्रमाणे माझा 2 दिवसापूर्वी वाढदिवस झाला. "आता सेलेब्रेशनच वय आहे का? अजून लहान आहे का? असा ही टोला लावला जातोच "तरी आपले ते आपलेच, ते नव्याने आयुष्य भेटलं त्याचा आनंद देत हे मित्रच आणि घरचे  जगण्याची नवी उमेद देतात. त्या साठी जमेल त्या पद्धतीने ते सुंदर करण्यासाठी ह्या आपल्या माणसाची धडपड असते. ते करतात सुद्धा छोट्याश्या cake वरून ते वेगेवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या गिफ्टपर्यंत असा सारे काही निराळे. Cake किंवा गिफ्ट हे काही मैत्रीच किंवा नात्याचे प्रेमाचं परिमाण नाही. इथे दिलेलं साधं फुल सुद्धा खूप मोलाचे असते. कारण पुन्हा नव्याने सुरवात करण्यासाठी दिलेली ती ऊर्जा असते.
यावर्षी जरा कहरच झाला.... आई बाबा भाऊ नी नातेवाईक यांनी दरवर्षी प्रमाणे जसा सुंदर केला तितकाच सुंदर थोडया वेगळ्या पद्धतीने मित्रांने पण केला.... नी पुन्हा आयुष्यातील मायेच्या गोधडीत सुंदर आठवणीचा एक टाका विणला....
ते असा कि ह्या वर्षी बर्थडे ला मला त्यांनी मोबाईल गिफ्ट केला... तुमच्या पैकी काही जणांना ते खूप ok यात काय मोठं असा वाटू शकत... पण या मागे त्यांनी केलेली धडपड हेच  माझं मोठं गिफ्ट आहे..म्हणजे इथे receession चालु असताना मार्केट मध्ये खर्चाचा बोजा डोक्यावर असताना स्वतःची अशी काही गोष्टी बाजूला सारून स्वतः एक घास कमी खाऊन मला खाऊ घालणारे असे हे वेडे मित्र... काय कराव यांचं...वाढदिवसाला माझ्या साठी घरात आईने नी, मोठ्या आईनेच माझ्या आवडीचं जेवण खाऊ घातलं होतं आतापर्यंत,  this time माझ्या मैत्रिणीने पण माझ्या आवडीचा बेत करून सर्वाना जेवण करू घातलं पार्टी दिली... काय करू ह्या वेड्या मैत्रिणीचं..बर अस काहीच नाही माझे घरचे हे देत नाही किंवा करत नाही तेपण इतक्याच आनंदाने करतात नी केलंय पण... पण इथे माझ्याशी कसलंच रक्ताचं नातं नसताना, नुसते गिफ्ट वरून नाही तर काहीवेळेस त्यांच्या प्रेमातून असण्यातून खूप दिल असे हे मित्र मैत्रीण ....   
         देवघरात तर नक्कीच नाही ठेवायचं पूजा करायला नाहीतर मलाच धरून मारतील, हा पण जसे काहींच असे मत असते कि  "मित्र हे उंबरठ्या पर्यंत असतात, शेवटी फॅमिलीच सोबत असते ",  काय करायच अश्या मित्रांच जे सुदामा सारखा स्वतःच घास काढून देतात, जी मैत्रीण स्वतःच एखाद्याला आयुष्य उभारून देण्यासाठी सर्व सोडून द्यायला तयार असते. काय कारायचे यांचं... बरेच वेळा म्हटलं जाते "एकच मित्र ठेवावा पण चांगला असावा." इथे तर सर्वच चांगले आहेत नी एकच ठेवावं ते काय खेळणं आहे. अरे आधीच नात्यामध्ये अपेक्षा, जबाबदारी, बंधने यांनी जखडून ठेवलं. मैत्रीला कशाला हवी parameter... ज्या नात्यात मैत्री राहते तिकडे सर्वच सोपं होऊन जाते कारण तिकडे असतो अखंड विश्वास नी प्रेम. ती आई असते,  कधी आजी असते,  बाबा असतो, कधी भाऊ असतो,  कधी बहीण असते,  कधी ताई असते, कधी काका असतो,  कधी काकी असते, तर कधी कुणीच नसतो रक्ताचा तरी सर्व काही असतो त्या जीवाचा.....
            माझ्या बाप्पाला खूप थँक्स ज्यानं जसे सुंदर फॅमिली दिली तितकीच गोड रक्ताची नसलेली पण त्याही पलीकडची सुंदर मित्र मैत्रीण दिले. I am very lucky girl for this.Harry Potter मधल्या कथानकातली मी स्वतःला Harrych वाटते जिला Dumboldor सारखा सांगतो मित्रांची साथ कधी सोडू नको तेच तुझी strength आहे. नी ते माझ्यासाठी खरं सुद्धा... पुढच्या जन्मी येतील कि नाही माहीत नाही ह्या जन्मी तरी सर्व एकत्र आली आहेत.... तेरा मुझसे हे पेहले का नाता कोई... गाणं डोकं वर काढतंय... तुम्ही सर्व jealous होऊ नका.सध्या ते ह्या जन्मी तरी माझे आहेत... तुम्हाला सर्वाना असेच मित्र मिळो, हे नको... this time ते फक्त माझ्यासाठी.... ह्या अश्या माझ्या सर्व mad frinds साठी खूप सारे प्रेम अगणित...